दि न्यू इंग्लिश स्कूलच्या संजय साबळे यांना गुणवंत साहित्यिक पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2020

दि न्यू इंग्लिश स्कूलच्या संजय साबळे यांना गुणवंत साहित्यिक पुरस्कार

संजय साबळे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा, संघ कोल्हापूर यांच्याकडून दि न्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशिल शिक्षक संजय साबळे यांना सन२०२० ऑनलाईन ई पुरस्कार  जाहिर झाला आहे. 

        संजय साबळे यांनी विद्यार्थ्याच्या लेखन व वाचन कौशल्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. आतापर्यंत त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तर 'बालसाहित्य' या विषयावर पीएचडीच्या प्रबंधासाठी सौ. निवेदिता माने कोल्हापूर यांनी' *आठवणींच्या हिंदोळ्यावर, दप्तरातल्या चारोळ्या, प्रतिज्ञा मंत्र, शब्द शिंपल्यातील मोती* ' या संजय साबळे यांच्या पुस्तकांचा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग केला आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी 'साहित्य सोनियाच्या खाणी ' या लेखमालेतून ' आठवणींच्या हिंदोळ्यावर व दप्तरातील चारोळ्या ' या दि न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलांनी लिहिलेल्या कथांची दखल बालसाहित्यिंकाना घ्यायला लावली. संजय साबळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्राचार्य आर. आय. पाटील, उपप्राचार्य ए. जी. बोकडे, पर्यवेक्षक एस. जी. सातवणेकर यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment