पंतप्रधानांनी "स्वामीनाथन आयोग" लागू करण्याची मागणी - शेकापचे तहसीलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2020

पंतप्रधानांनी "स्वामीनाथन आयोग" लागू करण्याची मागणी - शेकापचे तहसीलदारांना निवेदन

पंतप्रधानांनी "स्वामीनाथन आयोग" लागू करण्याची मागणी शेकापच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. 

चंदगड / प्रतिनिधी

         देशातील शेतकऱ्यांसाठी "स्वामीनाथन आयोगा"ची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकी पुर्वी दिले होते. शेतक-यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन चंदगड तालुका शेकापच्या वतीने नुकताच तहसीलदार चंदगड यांना देण्यात आले.

        निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगा ची अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई साठी वेळोवेळी सरकारकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही. निवडणूक पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीत निवडून आल्यानंतर देशात स्वामीनाथन आयोगा ची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले होते.त्याची पूर्तता करावी हा आयोग लागू केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळेल.त्यामुळे मदतीची गरज लागणार नाही.असे निवेदनात म्हटले आहे

    तहसीलदार विनोद रणावरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी  शेकाप व प्रकल्पदाता संघटनेचे भाईसाहेब जंगमहट्टीकर,दिलीप शेलार,उमेश टोपले, रविंद्र कसबल्ले, बाळासाहेब हळदणकर, जयराम हळदणकर, काजीर्णे चे माजी सरपंच लक्ष्मण पारधी, चंदगड शहर चिटणीस शिवाजी चंदगडकर, प्रकाश कोल्हाळ, सुरेश पांडुरंग पाटील, श्रीकांत पाटील,संजय पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.No comments:

Post a Comment