![]() |
गडहिंग्लज येथे पारिवर्तन मेळावा व बौद्ध वंदना प्रसंगी उपस्थित जानबा कांबळे, बी. के. कांबळे. |
गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
गरीब जनतेला न्याय मिळवून देणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय , राज्यमंत्री डॉ .रामदास आठवले व सीमाताई आठवले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता . संपूर्ण देश व महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यक्रम रद्द केले होते. महाराष्ट्रासह देशातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते श्रीआठवले कोरोनावर मात करून सुखरूप बाहेर येवून दीन, दलित समाजाची सेवा करण्यासाठी लवकर बरे व्हावेत म्हणून गडहिंग्लज येथे रिपब्लीक पार्टी ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागाकडून परिवर्तन मेळावा व बौद्ध वंदना कार्यक्रम घेण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बी. के .कांबळे तसेच जिल्हा नेते सतिश (दादा) माळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जानबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नाम: आठवले व ताईसाहेब कोरोनातून लवकर बरे व्हावेत म्हणून सामुदायिक बौद्ध वंदना गडहिंग्लज येथे घेण्यात आली .या कार्यक्रमासाठी दिनकर कांबळे जेष्ठ नेते माजी सरपंच साजणी ,किरण नामे तालुकाध्यक्ष हातकणंगले, शिवाजी कांबळे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष, नामदेव कांबळे तालुकाध्यक्ष गारगोटी, विजय कांबळे तालुकाध्यक्ष आजरा, कुंडलिक कांबळे तालुकाध्यक्ष राधानगरी ,भारत सोरटे तालुकाध्यक्ष पन्हाळा, विठ्ठल चुडाई जेष्ठ नेते रिपाई ,मोहन बारामती शहराध्यक्ष गडहिंग्लज, ज्ञानदेव धर्माधिकारी उपाध्यक्ष चंदगड, भरमु शिंदे युवा अध्यक्ष चंदगड, अशोक गायकवाड जेष्ठ नेते शाहूवाडी, विशाल कांबळे जिल्हाध्यक्ष रोजगार आघाडी, नितीन कांबळे गांधींनगर, श्रीकांत मालेकर हातकणंगले, सचिन आडसूळ कोल्हापूर, प्रविण कांबळे करवीर, सलमान मौलवी कोल्हापूर, अमर गायकवाड कोलोली, राहुल कटकोळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment