कोवाड महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2020

कोवाड महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना मेळावा संपन्न

कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्या प्रसंगी प्राध्यापक व माजी विद्यार्थी.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

          कोवाड (ता. चंदगड) येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही आर. पाटील उपस्थित होते.

            सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचे स्वागत प्रा. दीपक पाटील यांनी केले . महाविद्यालयाचे नेक NAAC  पुनर्मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालय सज्ज झालेले आहे   कमिटीच्या आणि कामकाजाच्या चर्चेसाठी समाजातील सर्व घटकांची भूमिका  समजून घेण्यासाठी सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे असते.  त्यामध्ये  आजी-माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या विकासामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. या सामाजिक जाणिवेतून माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना महाविद्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. त्याचे अध्यक्ष श्री नरसिंह पाटील उपाध्यक्ष श्री संजय पाटील खजिनदार श्री बाळकृष्ण गणाचारी आणि सदस्य संतोष शरबिद्रे श्रीकांत पाटील, अजित पाटील, बाळकृष्ण गणाचारी या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान आणि  भूमिका महत्ताची असते.  महाविद्यालयाचा विकास भूमिका या अनुषंगाने चर्चा करण्यात आले. मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांचे सहकार्य योगदान मार्गदर्शन महत्वाचे आहे म्हणून डॉ. व्ही आर. पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले .तसेच NAAC चे समन्वयक डॉ. ए एस. आरबोळे प्रा.  मुकेश कांबळे यांनी  माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन.या संदर्भात माजी विद्यार्थ्यांची भूमिका या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी प्रा डॉ. आर.डी. कांबळे उपस्थित होते  NAAC साठी लागणारे सर्व सहकार्य मार्गदर्शन योगदान आपण माजी विद्यार्थ्यांच्या वतीने देण्याचे आश्वासन श्री नरसिंग पाटील अध्यक्ष आणि  उपाध्यक्ष संजय पाटील , खजिनदार बाळकृष्ण गणाचारी  यांनी आपल्या मनोगतातून मानले. यावेळी अजित पाटील, श्रीकांत पाटील संतोष शरबिद्रे यांचीही मनोगते झाली. आभार डॉ. दीपक  पाटील यांनी मानले.  सर्व  माजी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांचे आभार व्यक्त प्रा आर टी पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी संघटना चे पदाधिकारी प्रा. डॉ.  दीपक पाटील यांनी केले होते.

No comments:

Post a Comment