चंदगड येथील कृषी कार्यालयात बुधवारी काजू उत्पादनावर मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

03 November 2020

चंदगड येथील कृषी कार्यालयात बुधवारी काजू उत्पादनावर मार्गदर्शन

चंदगड / प्रतिनिधी

    चंदगड येथील कृषी कार्यालयात बुधवार ४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी अकरा वाजता काजू उत्पादन या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये काजू लागवड, मोहोर व्यवस्थापन आणि काजुवरील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर  काजू शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी चंदगड तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन चंदगड तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.No comments:

Post a Comment