चंदगड येथे घरफोडी, ६८ हजारांचा ऐवज लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2020

चंदगड येथे घरफोडी, ६८ हजारांचा ऐवज लंपास

 

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड पैकी देसाईवाडी येथील सौ विदया पांडुरंग पाटील (रा. चंदगड पैकी देसाईवाडी, मूळ गाव  जंगमहटटी, ता चंदगड) यांच्या राहत्या घराचे कुलूप  तोडून सुमारे ६८ हजार ८०० रुपये सोन्या चांदीच्या दागिन्यांची अज्ञात चोरट्यांने चोरी केली. 

      सौ. विद्या या देसाईवाडी येथे  विजय चौगले यांच्या घरी भाडेकरु होत्या. अज्ञात चोरट्यांने घराचा पाठीमागील बंद दरवाजा  उघडुन घरात प्रवेश करुन बेडरुम मधील लोखंडी कपाटाच्या दरवाजा तोडून   रोख ३५००० हजार रूपये व चांदीची सहा ताटे,सोन्याचे झूबे,नथ,अंगठी, जोडवी आदी   सोन्याचे दागीने चोरट्यांने  चोरून नेलेची फिर्याद सौ विद्या पाटील यानी चंदगड  पोलीस ठाणेत  दिली आहे, फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करणेत आला आहे.
No comments:

Post a Comment