चंदगड येथे धाडसी चोरी, १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2020

चंदगड येथे धाडसी चोरी, १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

चंदगड / प्रतिनिधी

      चंदगड येथील विनायकनगरात अज्ञात चोरट्यांनी सेवानिवृत सैनिकाच्या घराचा दरवाजा फोडून एक लाख तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चंदगडच्या भरवस्तीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. 

      भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या महादेव दतू दळवी यांनी चंदगड येथील विनायकनगरात घर बांधले असून ते शेतीच्या कामासाठी आपल्या मूळगावी कळसगादे येथे गेले होते. त्यांच्या हालचालीवर पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्यांनी रात्री घराचा सिमेंटचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील रोख एक लाख रुपये आणि सोन्याच्या दोन अंगठ्या असा एक लाख तीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून शनिवारी गडहिंग्लज विभागाचे डिवायएसपी गणेश इंगळे यानी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. चोर स्थानिक असावेत असा पोलिसांचा संशय असून तपास पोलिस हवालदार डी. एन. पाटील करीत आहेत.



No comments:

Post a Comment