हेरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ, एकास अटक - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2020

हेरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ, एकास अटक

                                 

चंदगड / प्रतिनिधी

      हेरे (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.  सुर्यकांत गणपती कांबळे यांना सुळये येथील संशयित प्रदीप गुरव याने अश्लिल भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी चंदगड पोलीसांनी अटक केली आहे. 

    यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी -  डॉ. कांबळे हे आपल्या कार्यालयात दैनंदिन काम करीत असताना गुरव हा  बेकायदेशीर आत शिरुन एका महिलेचा  गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांना जबरदस्ती करीत होता. यावेळी कांबळे यांनी बेकायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार मला नाही. असे सांगताच तुला डॉक्टर कुणी केले. तुझी लायकी कचरा साफ करायची. असे म्हणत अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुरव याला अटक केली आहे. याबाबतची फिर्याद डाॅ. कांबळे यांनी चंदगड पोलिसात दिली असून अधिक तपास पोउनि दिलीप पवार करत आहेत.No comments:

Post a Comment