युवकांनी उद्योगासाठी पुढे यावे - के. एम. हुलजी - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2020

युवकांनी उद्योगासाठी पुढे यावे - के. एम. हुलजी

 

पाटणे फाटा येथे निर्माण कन्स्ट्रक्शनचे ऊदघाटन करताना के. एम. हूलजी, धोंडिबा यादव व मान्यवर.

तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा


नोकरीमध्ये आयुष्यभर नोकर म्हणूनच काम करावे लागते . पण उद्योग - व्यवसाय काढला तर मालक बनून राहता येते . त्यामूळे यवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन निवृत्त शिक्षक के .एम. हुलजी यानी केले .
  पाटणे फाटा ( ता. चंदगड ) येथे निर्माण कन्स्ट्रक्शन च्या कार्यालय शुभारंभ प्रसंगी श्री .हुलजी बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  धोंडिबा यादव होते .
प्रारंभी कार्यालयाचे उदघाट के .एम. हुलजी व धोंडिबा यादव यानी केले .स्वागत कार्यालय प्रमूख अभियंता रजत हूलजी यानी केले . यावेळी बोलताना रजत हूलजी म्हणाले , बांधकाम व्यवसायातील तीन वर्षांचा अनुभव असून शासकीय परवाना आहे . तालूक्यातील जवळपास १ हजार पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे काम निरीक्षणाखाली पूर्ण केले आहें . तर महापूराच्या काळात जवळपास ४०० शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे काम शासनाच्या आदेशाने पूर्ण केले आहे. विविध कामांचा अनुभव असल्याने याचा चंदगड च्या जनतेने लाभ घेण्याचे आवाहन रजत हुलजी यानी केले .
यावेळी शासकीय ठेकेदार विलास पाटील , बळीराजा शेतकरी संघटना अध्यक्ष नितिन पाटील ,तालूका संघ संचालक तानाजी गडकरी , डॉ .राहूल पवार , डॉ .एन.टी. मुरकुटे , संदिप मोहिते , प्रदीप झाजरी , अरूण गुरव , महादेव नार्वेकर , परशुराम मोहिते , सतीश झाजरी , मितेश पाटील , आनंद हुलजी , दाजीबा पाटील आदि मान्यवर उपस्थित होते .आभार धैर्यशील यादव यानी मानले .


No comments:

Post a Comment