शिवनगे येथील रांगोळी स्पर्धेत प्रतिक्षा पाटील प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2020

शिवनगे येथील रांगोळी स्पर्धेत प्रतिक्षा पाटील प्रथम


चंदगड / प्रतिनिधी

            शिवणगे (ता. चंदगड)  येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत कू.प्रतिक्षा प्रदिप पाटील हिने पहिला क्रमांक मिळवला. या रांगोळी स्पर्धेत कू.प्रतिक्षि हिने कोरोना महामारीवर आधारित सुंदर रांगोळी रेखाटली होती. तर व्दितीय क्रमांकासाठी कू ऐश्र्वर्या उध्वव पाटील हिने रेखाटलेल्या रांगोळीची निवड करण्यात आली. जे. डी. पाटील, प्रा.अजित सांबरेकर, राजू पाटील, धोंडिबा पाटील, संजय आवडणकर यांनी परिक्षण केले. शिवणगे सरपंच अरुण सतबा पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष दयानंद विठोबा पाटील व अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.No comments:

Post a Comment