अथर्व-दौलतचा पहिला हप्ता प्रतिटन २८०० रूपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - अध्यक्ष मानसिंग खोराटे - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2020

अथर्व-दौलतचा पहिला हप्ता प्रतिटन २८०० रूपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - अध्यक्ष मानसिंग खोराटे

दौलतचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / प्रतिनिधी

     हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा.लि. लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यात १५ नोव्हेंबर अखेर गाळप झालेल्या ऊसाचे प्रतिटन २८०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. उर्वरित रक्कम ही टप्प्यात टप्प्याने देण्यात येणार असल्याचेही श्री. खोराटे यानी सांगितले. 
     यावर्षी मशिनरी दुरुस्तीची कामे उत्तम प्रकारे झाल्यामुळे कारखाना पुर्ण क्षमतेने चालु असून संपुर्ण ऊसाची तोड कार्यक्षेत्रातूनच चालु आहे. आजअखेर १ लाख मे. टन ऊस गाळप झाले आहे. चंदगड कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस संपवणुच कारखाना बंद करण्यात येईल. तसेच चंदगडच्या दुर्गम भागात हत्तीचा वावर वाढलेला असून ऊस पिकांचे नुकसान करत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून सदर ठिकाणी १२ ते १४ टोळ्या कार्यरत केल्या आहेत. अशा ठिकाणी ऊस तोडीला अग्रक्रम दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासावरच ६ लाख मे.टन ऊस गाळपाचे उदृिष्ट पुर्ण करणार आहोत. शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस अथर्व-दौलतकडे पाठवून सहकार्य करावे असे अथर्वचे अध्यक्ष खोराटे यांनी सांगितले आहे. यावेेळी एच. आर. मॅनेजर जी. एस. पाटील, शेती अधिकारी युवराज पाटील, भुषण देसाई उपस्थित होते.


No comments:

Post a Comment