राजगोळी खुर्द येथील आर. आर. पाटील यांना 'नेशन बिल्डर अवार्ड' पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2020

राजगोळी खुर्द येथील आर. आर. पाटील यांना 'नेशन बिल्डर अवार्ड' पुरस्कार

कोल्हापूर येथे 'नेशन बिल्डर अवार्ड' सपत्निक स्वीकारताना आर आर पाटील सोबत मान्यवर व रोटरी क्लब पदाधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील जि. प. प्राथमिक शाळेचे अध्यापक आर. आर. पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड) यांना सन २०२०-२१ चा 'नेशन बिल्डर अवार्ड' प्राप्त झाला आहे.

        रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांचे मार्फत दिला जाणारा हा मानाचा जिल्हास्तरीय पुरस्कार आहे. ४ नोव्हेंबर रोजी प्राचार्य डॉ . क्रांतीकुमार पाटील, यांच्या हस्ते रोटरी क्लबचे अध्यक्ष  अरविंद कृष्णन, सेक्रेटरी सिद्धार्थ पाटणकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराच्या निमित्ताने पाटील यांनी शैक्षणिक, संघटनात्मक तसेच गरिब होतकरू विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याची दखल रोटरी क्लब ने घेतली आहे. या निमित्ताने त्यांचे  सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
 

No comments:

Post a Comment