कोवाड महाविद्यालयात विद्यार्थी दिवस संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2020

कोवाड महाविद्यालयात विद्यार्थी दिवस संपन्न

कोवाड मदाविद्यालयात विद्यार्थी दिवसानिमित्य उपस्थित मान्यवर

तेऊरवाडी - सी . एल . वृत्तसेवा

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर  शाळा  प्रवेश दिन कार्यक्रमाचे आयोजन सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड ( ता. चंदगड ) येथे विद्यार्थी प्रवेश दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

          डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथे दिनांक 7 नोव्हेंबर या दिवशी  प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे शाळा प्रवेश केला.  हा दिन संपूर्ण देशभर ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ . व्ही . आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ . आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नरसिंग पाटील  आणि अजित पाटील यांच्या हस्ते झाले. प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आर टी. पाटील यांनी केले. प्रास्ताविक दीपक पाटील यांनी केले.  

        प्राचार्य डॉ . व्ही आर पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व विशद केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचार प्रवाहांचा पुन्हा विचार व्हावा आणि संपूर्ण विश्वात सामाजिक समतेचे राज्य निर्माण व्हावे. पददलित अस्पृश्य समाजाची होणारी हेळसांड थांबण्यासाठी   शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.  शिक्षण प्रवाहामुळे मानवाचा उत्कर्ष साधता येतो म्हणजेच समाजाचा उत्कर्ष त्यातून होतो सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक विकास बनवायचा असेल तर संपूर्ण मानव जातीने शिक्षण प्रवाहात येणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले. या प्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी  संजय पाटील, उपाध्यक्ष.संतोष शारबिद्रे,अजित पाटील, श्रीकांत पाटील, नरसिंग पाटील.,बाळकृष्ण गणाचारी  यांची मनोगते झाली तसेच प्रा. दीपक पाटील प्रा. आर टी पाटील यांची मनोगते झाली. या कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. ए. एस . आरबोळे   यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने केले होते. यावेळी प्रा. डॉ.आर. डी कांबळे विलास शेटजी ,दयानंद पाटील, मारुती बिर्जे उपस्थित होते. सदर कार्यक्रम covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद प्रशासक सेवक कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment