महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदगड आयोजित खुल्या कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन १३ व १४ नोव्हेंबर २०२० रोजी तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयाच्या पटागंणावर करण्यात आल्याची माहीती जिल्हा उपाध्यक्ष पिणु उर्फ प्रताप पाटिल यांनी दिली.
दिपावली निमित्य व त्याचबरोबर कोरोनाच्या महामारीत लॉकडॉऊण मुळे खेळाडुंना घरातच बसावे लागले होते. खेळाडुंच्यामध्ये नवचैतन्य यावे या उद्देशाने ह्या कब्बड्डी स्पर्धाचें आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री. पाटिल यांनी दिली.
या स्पर्धसाठी अनुक्रमे २११११, १५१११, १०१११ अशी रोख रक्कम बक्षिस म्हणून तर शिस्तबंघ संघ, उत्कृष्ट संघ, उत्कृष्ट पकड यासाठी ट्राफी ठेवण्यात आली आहे. ह्या स्पर्धासाठी प्रवेश फी १५१५ रु. ठेवण्यात आली आहे. ८६६९६्२५७१९ या मोबाईल नंबरवर सपंर्क साधुन जास्ती जास्त कब्बड्डी संघानी सहभाग घेण्याचे आवाहन मनसेचे तालुका अध्यक्ष राज सुभेदार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment