बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला अभिवादन करताना मुजावर व शिवसैनिक. |
चंदगड / प्रतिनिधी
महागाव मधिल शिवसेना शाखेमार्फत स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखलाक मुजावर होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन मारुती पाटोळे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते फोटो पुजन व दीपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुजावर व मारुती पाटोळे यांनी आपल्या भाषणातून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांची महाराष्ट्रातील फक्त एक राजकारणी म्हणुन ओळख नसुन महाराष्ट्रासह संपुर्ण देशाला सकारात्मकता उर्जा देणारा एक उत्तम विचार म्हणुन ओळख होती. अशा शब्दांत त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या बद्दलचा आसलेला आदर व्यक्त केला. सुरवातीला स्वागत व प्रास्ताविक रामजी घेवडे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला मारुती पाटोळे, पिंटु गाडीवडर, अशोक सुरंगे, संदीप माणगावकर, तानाजी अस्वले (फौजी) यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. नरसिंग गुरव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment