अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यानी स्नेहमेळाव्यातून जोपासल्या जुन्या आठवणी - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2020

अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यानी स्नेहमेळाव्यातून जोपासल्या जुन्या आठवणी

 

अडकूर -संजय पाटील 

अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूलचे २००० मधील इयत्ता दहावी बॅचचे एकाच बेंचवर बसलेले व पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले संवगडी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमीत्ताने वीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते. आनंद, कौतुक आणि जुन्या आठवणींना उजाळा यामध्ये संवगडी रंगून गेले होते. इंग्लिश मिडीयम स्कूल येथे स्नेह मेळावा संपन्न झाला. स्नेह मेळाव्याचे नेटके नियोजन सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिवाळी सणाचे औचित्य साधून केले गेले होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार, स्नेह भोजन कार्यक्रम झाला. समन्वयक रामू फगरे यांनी स्वागत व प्रास्ताविकात माजी विद्यार्थी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवन आणि सध्याचे जीवन खूप वेगळे आहे. नोकरी, व्यवसाय, संसारात गुंतून पडलो असलो तरी एकमेकांच्या सुखदुःख प्रसंगी मदत करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. संपदा जाधव म्हणाल्या, वीस वर्षांनंतर शालेय मित्र-मैत्रिणींनी एकत्र आल्याचा आनंद अविस्मरणीय आहे असे सांगून शालेय जीवनातील अनेक प्रसंगाना उजाळा दिला. वैजयंता पाटील, शोभा देसाई, दिपा कापसे, सुनिल पवार, विश्वास जाधव, समीर कोवाडकर, शाजीद शेख यांनी मनोगतात यापुढे मित्र-मैत्रिणींनी सोशल मिडीयाद्वारे, प्रत्यक्ष गाठीभेटीच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी विठ्ठल पाटील, संजय तिबिले, पांडुरंग पाटील, नंदकुमार मटकर, शामल पाटील, संगिता पाटील, सुनिता कांबळे, वैशाली बागवे, मनिषा सांबरेकर, वैशाली परदेशी, सविता पाटील, रेखा पाटील, रविंद्र जाधव, विलास जाधव उपस्थित होते. रमेश सोनार यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र मुरूडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रविण गुडवळेकर, शंकर हिंडगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले.




No comments:

Post a Comment