कोवाड महाविद्यालयात संविधान दिन व शहीद जवानांना आदरांजली - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2020

कोवाड महाविद्यालयात संविधान दिन व शहीद जवानांना आदरांजली

कला महाविद्यालयात संविधान दिन व शहिदांना आदरांजली वाहताना प्राचार्य व्ही.आर. पाटील, डॉ. आर. डी. कांबळे व इतर मान्यवर. 
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       येथील सर्वोदय  शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एन एस एस विभागाच्या संविधान दिन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने 26 11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीराना आदरांजली कार्यक्रम अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         प्रारंभी 26 /11 च्या मुंबई त झालेल्या भ्याड हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त केलेल्या वीर जवानांना, शहीदाना दोन मिनिटाची स्तब्धता राखून आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी प्रा. डॉ. आर.डी. कांबळे यांनी वीर जवानांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे  त्यांनी प्रतिपादन केले. आणि वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. के एस. काळे यांनी केले. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि संविधानाचे पूजन प्राचार्य डॉक्टर व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकेचे वाचन प्रा. डॉ. आर.डी. कांबळे यांनी केले. संविधानाची मूलतत्त्वे या विषयावर प्राचार्य व्ही आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, समानता ही मूलभूत तत्वे  मानवी समाज व्यवस्थेला आधारभूत आहेत. जगात एकमेव संविधान भारतीय समाजातील बांधवांना देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले. त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने हे भव्य दिव्य  संविधान  भारतीय समाजाला  प्रदान करण्यात आले.  वैश्विक स्तरावरून भारतीय संविधानाचा अभ्यास वेगळ्या अंगाने होत आहे आणि  ही बाब आपणास गौरवास्पद आहे असे प्रतिपादन प्रा .डॉ. व्ही.आर पाटील आपल्या मार्गदर्शनातून केले.

         प्रा. डॉ. ए के. कांबळे यांनी संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा आपल्या  मनोगत्यातून  व्यक्त केला. आभार प्रा. एन. पी महागावकर ग्रंथपाल यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील डॉ. के. एस. काळे, डॉ. आर. डी कांबळे, डॉ. ए. के. कांबळे डॉ. व्ही. के दळवी, दयानंद पाटील, मारुती बिरजे, अजित व्हण्याळकर, अशोक सावंत, लक्ष्मण बागीलगेकर, नामदेव पाटील  सर्व विभागातील प्राध्यापक प्रशासकीय सेवक कर्मचारी उपस्थित होते.

     या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी एन एस एस. विभाग आणि सांस्कृतिक विभागाने केलेले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.No comments:

Post a Comment