आमदार राजेश पाटील उभयतांनी कोवाड येथे बजावला मतदानाचा हक्क - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2020

आमदार राजेश पाटील उभयतांनी कोवाड येथे बजावला मतदानाचा हक्क

मतदान केल्यानंतर मतदान केल्याचे चिन्ह दाखवताना आमदार पाटील व सौ.पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            पूणे पदविधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये कोवाड (ता. चंदगड) मतदान केंद्रावर चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील व सौ. सुस्मिता राजेश पाटील यानी पदविधर मधून मतदानाचा हक्क बजावला.

            आमदार राजेश पाटील व सौ. सुस्मिता पाटील यांनी म्हाळेवाडी येथून पदविधर मतदार नोंदणी केली होती. आज सकाळी १०.१५ वाजता मतदान केंद्रात आल्यानंतर आमदार पाटील  उभयतांचे  येथील केंद्रावर तैनात असलेल्या वैद्यकिय पथकाने थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमिटर घेतल्यानंत मतदान करण्यास परवानगी देण्यात आली. मतदान केल्यानंतर आमदार पाटील  उभयतांनी बोटे वरती करून विजयाची निशाणी दाखवली.

                                       *सकाळी १० पर्यंत २० % मतदान* 

      सकाळच्या सत्रात २० % मतदारानी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. कोवाड केंद्रावर शिक्षक मतदार संघासाठी ११०५ केंद्रावर २३४ शिक्षक मतदार आहेत. तर पदविधरसाठी ११०४-१- या केंद्रावर ४८० व ११०४-२- या केंद्रावार ४७४  मतदार नोंद आहेत. चंदगड तालूक्यात प्रत्येक मतदाराला  मतदान केंद्रापर्यंत  आणण्यासाठी कार्यकर्ते धडपडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment