![]() |
सुमित बंडू पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री तालुका चंदगड येथील धावपटू कु.सुमित बंडू पाटील (बाळुजगावडे) इयत्ता आठवी, याने करगणी, ता .आटपाडी, जि.सांगली येथे पार पडलेल्या मॅराथॉन स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. १४ वर्षे वयोगटात तीन किमी अंतर धावणेच्या राज्यस्तरीय तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा दि. १ डिसेंबर रोजी सकाळी पार पडल्या. या स्पर्धा अथलेटिक्स ग्रुप व जयश्रीराम व्यायाम व कला, क्रीडा मंडळ करगणी यांनी आयोजित केल्या होत्या.
सुमितने निवडक ७२ स्पर्धकांमधून मिळविलेले यश कालकुंद्री गावासह चंदगड तालुका व कोल्हापूर जिल्ह्याला भूषणावह ठरले आहे. या खडतर यशाबद्दल सुमित चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment