चंदगड तालुक्यात पदवीधर साठी ७४.२४ टक्के तर शिक्षक साठी सरासरी ९३.७९ टक्के चुरशीने मतदान - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2020

चंदगड तालुक्यात पदवीधर साठी ७४.२४ टक्के तर शिक्षक साठी सरासरी ९३.७९ टक्के चुरशीने मतदान

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 : चंदगड तालुक्यातील कोवाड पदवीधर मतदान केंद्रावर झालेली मतदारांची गर्दी.

 चंदगड :  सी एल वृत्तसेवा

           पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० साठी चंदगड तालुक्यातील ११ मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दोन्ही मतदारसंघासाठी मतदान करण्यासाठी मतदारांत सकाळपासूनच उत्साह दिसून आला. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. दिवस अखेर मिळालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार शिक्षक मतदारसंघासाठी ९३.७९ टक्के तर पदवीधर साठी सरासरी ७४.२४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.

          एकूण ६१२ शिक्षकांपैकी ५७४ जणांनी तर २६१७ पैकी १९४३ पदवीधर मतदारांनी आपला हक्क बजावला. यावेळी सोशल डिस्टंसिंग सक्तीने पाळण्यात आले. आलेल्या प्रत्येक मतदाराला आरोग्य विभागामार्फत ऑक्सिजन लेवल तसेच थर्मल टेस्टिंग करूनच मतदान केंद्रावर सोडण्यात आले. काही केंद्रावर मतदारांच्या नावात बदल असल्यामुळे मतदान नाकारल्याच्या घटना घडल्याने गोंधळ निर्माण झाल्याचे समजते. या सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती.  आमदार राजेश पाटील यांनी सपत्नीक कोवाड येथील पदवीधर केंद्रावर मतदान केले.

     पदवीधर साठी झालेले केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी

कन्या विद्यामंदिर चंदगड-७३.०५, 

केंद्रीय प्राथमिक शाळा दाटे- ७०.५७, 

मराठी विद्यामंदिर हेरे- ७०.३५, 

कुमार विद्यामंदिर तुर्केवाडी- ७९.५३. 

केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड- ७४.७३.

        शिक्षक साठी झालेले केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी

कन्या विद्यामंदिर चंदगड- ९८, 

केंद्रीय प्राथमिक शाळा दाटे- ९०.२४, 

मराठी विद्या मंदीर हेरे- ८७, 

केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड- ९४.४४, 

कुमार विद्यामंदिर तूर्केवाडी- ९४.७७.No comments:

Post a Comment