होसुर येथील सत्यनारायण मंदिरात दिपोत्सव साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2020

होसुर येथील सत्यनारायण मंदिरात दिपोत्सव साजरा

होसुर मधील सत्यनारायण मंदिरात दीपोत्सव साजरा करताना सुरेश घाटगे,दिनेश पाटील,दीपक पवार यांच्या सह ग्रामस्थ.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       होसुर (ता. चंदगड) येथे माळ नावाच्या शेतामध्ये असलेल्या सत्यनारायण मंदिरात दादा डेव्हलपरचे मालक सुरेश घाटगे व दिनेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने दीपोत्सव साजरा केला.

       गेल्या काही वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या मंदिरात नागरिकांनी यंदा दीपोत्सव साजरा केल्यामुळे सदर मंदिर उभारणीचा प्रश्न सर्वांसमोर आला असून सर्व ग्रामस्थांच्या मंदिराबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

         यावेळी सदर मंदिर उभारणीसाठी सुरेश घाटगेनी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, कर्यात भागात एकमेव असणारे सत्यनारायण मंदिर हे उभं राहणं गरजेचं असून सर्व ग्रामस्थांनी याबाबत पुढाकार घ्यावा. यावेळी शंकर पाटील, पाणी फौंडेशनचे अध्यक्ष दिपक पवार, नागनाथ गावडे, परशराम नाईक, ज्ञानेश्वर नाईक आदी सह होसुर ग्रामस्थ ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment