सडेगूडवळे येथे ८ जानेवारीला कुस्ती आखाड्याचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2020

सडेगूडवळे येथे ८ जानेवारीला कुस्ती आखाड्याचे आयोजन

चंदगड / प्रतिनिधी

        सडेगुडवळे (ता. चंदगड) येथील रत्नदिप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रामलिंग यात्रेकरू निमित्त शूक्रवार दि.८ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४ ते ७ यावेळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखत, प्रेक्षकविरहित कुस्ती मैदानचे आयोजन केले आहे . आखाड्यात येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत , सहभागी मल्लांची  मिरवणुक तयारी सुरू केली आहे .या आखाड्यात महिला कुस्त्याही होणार आहेत , आंतरराष्ट्रीय पंच व कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , पंच रामदास देसाई  सागर शिंदे , हणमंत गुरव , युवराज पाटील काम पाहणार आहेत.



1 comment:

Post a Comment