शरद पवारांचा वाढदिवस चंदगड येथे रक्तदानाने साजरा, आमदार राजेश पाटील यांनी केले रक्तदान - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2020

शरद पवारांचा वाढदिवस चंदगड येथे रक्तदानाने साजरा, आमदार राजेश पाटील यांनी केले रक्तदान

                चंदगड येथे रक्तदान शिबीराला मार्गदर्शन करताना आमदार राजेश पाटील.

चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदार शरद चंद्रजी पवार  यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त चंदगड येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर  सोयरीक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले. यावेळी चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यानीही रक्तदान केले.

                               रक्तदान करताना आमदार राजेश पाटील. शेजारी अन्य पदाधिकारी.

      बेळगाव येथील के. एल. ई रुग्णांलयातील आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचारी यांनी रक्तदान संकलन केले. यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले, `रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून हा तुटवडा भरून काढण्यासाठी कार्यकर्ते व युवकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे. शरद पवार साहेब ८० व्या वर्षीही शेतकऱ्यांसाठी  लढताहेत. त्यांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादीला बळकट करण्याचे आवाहनही आम. राजेश पाटील यानी केले.
        यावेळी हॉलमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आले. तसेच केक कापून शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रास्ताविक शिवानंद हुंबरवाडी यानी केले. यावेळी चंदगड नगरपंचायतीचे सर्व नगराध्यक्ष, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment