दौलत- अथर्व साखर कारखान्याच्या वाहनांना रिप्लेक्टर - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2020

दौलत- अथर्व साखर कारखान्याच्या वाहनांना रिप्लेक्टर

                          हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व कारखान्यातील वहानांना रिप्लेक्टर वाटप करतांना                                पोलिस उपनिरीक्षक श्री शिरगूप्पे,अथर्व-दौलत चे संचालक पृथ्वीराज खोराटे व इतर

चंदगड / प्रतिनिधी

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणार्या वहानांना उजळाईवाडी-कोल्हापूर  येथील वहातूक मदत  केंद्र व कारखाना प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने  रिप्लेक्टर वाटप करण्यात आली.       दौलत-अथर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रात्रीच्या वेळी अपघात होऊ नये यासाठी वहानांना रिप्लेक्टर बसवण्यात आली.व यावेळी वाहन मालक व चालक यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री शिरगुप्पी,श्री नलावडे,फौजदार श्री कोळी, हेडकॉन्स्टेबल प्रकाश कदम तसेच दौलत-अथर्वचे संचालक पृथ्वीराज खोराटे, युनिट हेड धनंजय जगताप उपस्थित होते.No comments:

Post a Comment