तब्बल नऊ महिन्यांनी उघडलेले चंदगड तहसिलचे प्रवेशद्वार
चंदगड / प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात नागरिकांची गर्दी वाढूून कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये. यासाठी चंदगड तहसिल कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार एप्रिल महिन्यापासून बंद करण्यात आले होते. पण चंदगड तालुक्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या गेले महिनाभर शुन्यावर आली आसल्याने गुरूवार १० डिसेंबर पासून तहसिल कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात चंदगड तहसिल कार्यालयाचा कारभार गेल्या एप्रिल महिन्यापासून मागच्या दरवाजाने सुरू असून यापुढे मुख्य प्रवेशद्वाराने कामकाज करावे, अशी मागणी नागरिकांतून होत होती.
एप्रिल महिन्यात कोरोना महामारीच्या संकटामुळे लॉकडॉऊन करण्यात आले. लोकांनी गर्दी करू नये वा लोकांना कार्यालयच बंद आहे, असे भासवण्यासाठी तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले . या घटनेला नऊ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. कार्यालयात येणाऱ्या लोकांची संख्याही वाढली आहे. हळूहळू कोरोनाची भीती कमी झाल्याने चंदगड तहसील कार्यालयात नागरिकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तहसिलदार विनोद रणवरे यानी मुख्य प्रवेशद्वार खुले केले.
No comments:
Post a Comment