आयकर भरणाऱ्या चंदगड तालुक्यातील ६१० शेतकऱ्यांकडून पी. एम. किसान योजनेतील वसुली सूरू - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2020

आयकर भरणाऱ्या चंदगड तालुक्यातील ६१० शेतकऱ्यांकडून पी. एम. किसान योजनेतील वसुली सूरू


चंदगड / प्रतिनिधी

         पंतप्रधान किसान योजनेतील आयकर भरणाऱ्या शेतकरी लाभार्थीकडून चंदगड तहसील कार्यालयामार्फत वसुली सुरू झाली आहे. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन - दोन हजारांच्या तीन हप्त्याने दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. त्याचा लाभ काही आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही घेतला.तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. नोकऱ्या करणाऱ्या परंतु जमिन नावावर असलेल्या लोकांनीही या योजनेचा लाभ घेऊन अनुदान मिळविले. 




चंदगड तालुक्यात ६१० लाभार्थ्यांकडून ५५ लाख ४० हजारांची वसुली सुरू झाली आहे. त्या-त्या गावाचे तलाठी अशा लाभार्थ्यांच्या संपर्कात असून पंतप्रधान किसान वसूली गतीने सुरू झाली आहे. चेक वा रोखीने योजना हे पैसे वसुल केले जात आहेत. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने आपली रक्कम चेक अथवा ऑनलाईन पध्दतीने भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार विनोद रणवरे यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment