चंदगड विधानसभा मतदारसंघात नरेवाडी व नगरगाव या दोन नवीन मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यता - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2020

चंदगड विधानसभा मतदारसंघात नरेवाडी व नगरगाव या दोन नवीन मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यता

चंदगड / प्रतिनिधी 

         चंदगड विधानसभा मतदारसंघात नगरगांव व नरेवाडी या दोन नवीन मतदार केंद्रांना भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली असल्याची माहिती तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली.त्यामुळे चंदगड तालुक्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १९८ वर गेली आहे. 



      तिलारीनगर या मतदान केंद्रापासून नगरगांव तर दाटे केंद्रापासून नरेवाडी ही गावे लांब अंतरावर असल्याने मतदारांना निवडणुकीत मतदान करण्यासाठी त्रास होत होता.याठिकाणी नवीन मतदान केंद्र मंजूर करावीत मागणी मतदारातून करण्यात आली होती. त्याला अखेर मान्यता मिळाली असून आता चंदगड तालुक्यातील मतदान केंद्रांची संख्या दोनने वाढून १९८ झाली आहे. तर चंदगड विधानसभा मतदार संघात एकूण ३७६ मतदान केंद्र आहेत.




No comments:

Post a Comment