चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात तालुक्यातील पदवी प्राप्त झालेल्या व वाड्यावस्त्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठ दूरशिक्षण केंद्राच्यावतीने एम. ए., एम. कॉम. हे पदव्युत्तर अभ्यासक्रम केंद्र सुरू केलेले आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गोरल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment