नवीन कृषी कायद्या विरोधात बंदला कोवाडला प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2020

नवीन कृषी कायद्या विरोधात बंदला कोवाडला प्रतिसाद

           कोवाड येथे कृषी कायद्याच्या विरोधात निषेध व्यक्त करताना प्रा दीपक पाटील,राजेंद्र पाटील व इतर

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

          नवीन कृषी कायद्या विरोधात भारत बंदला चंदगड तालुक्यातील कोवाड येथे शेतकरी तसेच व्यापाऱ्यांकडून सर्व व्यवहार बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंदगड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील, युवा आघाडी उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment