चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्रा. नागेंद्र जाधव हे २१ जून २००२ पासून इतिहास या विषयाचा अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. सेवेला नियमित मान्यता मिळावी. यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये न्यायालयाने सेवा नियमित करण्याचा आदेश दिला.तरीही संस्थाचालकाकडून याची दखल घेतली नसल्यानं प्रा. जाधव यांनी १ जानेवारी २०२१ पासून प्रतिवादी असलेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुख्य इमारतीसमोर बेमुदत सत्याग्रही धरणे आंदोलन करणार आहे असा इशारा दिला आहे.
प्रा. नागेंद्र जाधव यांनी आपली सेवा नियमित होण्याच्या संदर्भात आज अखेर मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. अनेक वर्षे त्यांनी विनावेतन अध्यापनाचे कार्य केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी एम. ए. बी. एड्. एम. फील., पी. एच. डी, सेट या शैक्षणिक पात्रता त्यांनी धारण केल्या आहेत. प्रा. नागेद्र जाधव यांची सेवा नियमित करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे चार आदेश असतानाही संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ आणि शासन यांच्याकडून या न्यायालयीन आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे. न्यायालयीन आदेशांचा मनमानी अर्थ काढून प्रा. जाधव यांना जाणीवपूर्वक नाहक मानसिक, आर्थिक त्रास देण्याचा वारंवार प्रयत्न यांच्याकडून होत आहे. या पूर्वी ही प्रा. जाधव यांनी १५ ऑगस्ट २०१९ व १५ ऑगस्ट २०२० रोजी आपल्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतु यावेळीही सर्व प्रतिवादी यांनी दबावाचे तंत्र वापरून प्रा. नागेंद्र जाधव यांना न्याय न देता, मा. उच्च न्यायालयाचा आदेश न मानताआपला अन्यायी कारभार सुरूच ठेवला आहे.
प्रा. नागेंद्र जाधव यांनी आपली सेवा नियमित होण्याच्या संदर्भात आज अखेर मा. उच्च न्यायालयात चार रिट याचिका दाखल केल्या आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी विनावेतन अध्यापनाचे कार्य केले आहे. आज अखेर न्यायासाठी मा. उच्च - न्यायालयात चार रिट याचिका दाखल केल्या आहेत. विनावेतन, विनापगार अध्यापनाचे काम केले आहे. अर्जदाराची व त्याच्या कुटुंबाची घरची परिस्थिती व आर्थिक स्थिती आज अतिशय दयनीय असताना न्यायासाठी फार मोठा आर्थिक त्रास सहन केला आहे. त्यांचे कुटुंब प्रचंड हालाखीचे व उपासमारीचे जीवन जगत आहे. मा. मुंबई उच्च-न्यायालयाचे चार आदेश असूनही सर्व प्रतिवादी जाणीवपूर्वक या मा. उच्च-न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवत आहेत. अर्जदाराला नाहक मानसिक, आर्थिक त्रास देत आहेत. यातुन अर्जदाराच्या सामाजिक व वैवाहिक जीवनात प्रचंड तणाव करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुर्वीही दोन वेळा आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यातूनही त्यांना योग्य न्याय न मिळाला नाही. प्रतिवादी यांच्याकडून न्याय मिळत नसल्याच्या नैराश्येतून, तसेच कुटुंबाची डोळ्यादेखत होणारी उपासमार, होरपळ असहनीय झाल्याने आपण संस्था, शासन, विद्यापीठ यांच्या अन्यायी कारभाराचा तीव्र निषेध करून दि. १ जानेवारी २०२१ रोजी पासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मुख्य इमारतीसमोर सत्याग्रही बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे, असे जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
बातमीदार - अनिल धुपदाळे, चंदगड - प्रतिनिधी
1 comment:
धन्यवाद साहेब आपले मनःपूर्वक आभार
Post a Comment