कोविडची लस देताना पत्रकारांचा प्राधान्याने विचार कराना - मराठी पत्रकार परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2020

कोविडची लस देताना पत्रकारांचा प्राधान्याने विचार कराना - मराठी पत्रकार परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई / प्रतिनिधी

              कोविड - 19 ला पायबंद घालणारी लस लवकरच बाजारात येत आहे.. ही लस सर्वात अगोदर कोणाला द्यावी याची चर्चा आता सुरू झाली आहे.. "वृध्द तसेच कोरोना यौद्यांना" ही लस दिली जावी असा निर्णय होण्याची शक्यता आहे.. त्यात पोलीस, डॉक्टर्स अशा घटकांचा उल्लेख केला गेला आहे.. त्यांना लस दिली गेलीच पाहिजे पण पत्रकार देखील कोरोना यौध्दे असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी एप्रिलमध्येच केला होता.. त्यामुळे लस देताना पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे..

             कोरोना काळात राज्यात तब्बल 43 पत्रकारांचे मृत्यू झाले.. 400 पेक्षा जास्त पत्रकार बाधित झाले होते.. यातील बहुतेक पत्रकार फिल्डवर काम करणारे होते.. त्यामुळे समाजासाठी योगदान देणारया पत्रकारांवर पुन्हा बाधित होण्याची वेळ येऊ नये यासाठी लस देताना पत्रकारांचा प्राधान्याने विचार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.. पत्रावर एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.




No comments:

Post a Comment