तांबूळवाडी ते लक्कीकट्टे दरम्यानचा रस्ताच गायब, वाहानधारकांना करावी लागते तारेवरची कसरत - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2020

तांबूळवाडी ते लक्कीकट्टे दरम्यानचा रस्ताच गायब, वाहानधारकांना करावी लागते तारेवरची कसरत

                                तांबुळवाडी ते लक्कीकट्टे दरम्यान रस्त्याची झालेली दयनीय अवस्था.

चंदगड / प्रतिनिधी

           तांबूळवाडी, बागिलगे, डूक्करवाडी, माणगाव, लक्कीकट्टे गावांच्या दरम्यान असलेल्या रस्त्यात पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे . या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरीत करण्याची मागणी प्रवाशी व वाहनचालकातून होत आहे .सहा वर्ष्यापूर्वी हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून झाला होता. त्यावेळीही या रस्त्याचे काम तत्कालीन ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे केले होते.नागरिकांच्या तक्रारी मूळे सदर ठेकेदारावर  कारवाई करण्यात आली होती.पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सडक योजनेतून झालेल्या रस्त्याची पाच वर्षे देखभाल दुरूस्ती करण्याची जबाबदारी सदर ठेकेदारावर असते.असा बांधकाम खात्याचा नियम आहे. पण ताबूळवाडी ते माणगाव दरम्यानच्या पंतप्रधान सडक योजनेतून झालेल्या या रस्त्यावरील खड्डे त्या ठेकेदाराने एकदाही बूजवले नव्हते.सध्यस्थितीत या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत,रस्त्यावरची खडीच गायब झाली आहे. त्यामुळे पूर्वी रस्ता होता का असा सवाल वहान धारकाना पडला आहे.या खड्डेमय रस्त्यांवरून साखर कारखान्याना ऊस वहातूक करणार्या ट्रॅक्टरांची मोठ्या प्रमाणात ये जा सूरू आहे, त्यामूळे या प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता कायम दुर्लक्षित राहिला आहे . आजपर्यंत फक्त एक वेळ या रस्त्यावर दुरुस्तीचे काम झाले आहे.त्यामुळे बांधकाम खात्याने नवीन रस्ता होई पर्यंत किमान खड्डे बूजवावेत अशी मागणी उपसभापती मनिषा शिवनगेकर, सरपंच संजय पाटील (तांबूळवाडी),सरपंच राजू शिवनगेकर (डूक्करवाडी) यांनी केली आहे .



No comments:

Post a Comment