करताना सभापती ॲड. अनंत कांबळे व पदाधिकारी.
चंदगड / प्रतिनिधी
जीवनात आलेली संकटेच माणसाला धीरवान बनवतात, त्यामुळे संकटाना घाबरण्यापेक्षा संकटाना धैर्याने सामोरे गेल्यास जगण्यात आनंद मिळतो असे प्रतिपादन पं. स. चे सभापती ॲड. अनंत कांबळे यांनी केले. चंदगड येथे पं स सभागृहात एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका रेणुका चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
संजय चंदगडकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी करून कष्टातून केलेले कोणतेही कार्य जीवनात आनंद देणारे असते असे सांगितले.
यावेळी माजी सभापती ज्योती पवार, अमर गारवे, स्वाती गोंदके, संपदा महागावकर, सोमनाथ गवस, डी. एन मोटुरे, अनिल शिवणगेकर, सुनिता प्रभू यांनी मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य बबन देसाई, दयानंद काणेकर, एस. व्ही. सावळगी, शरद पवार, श्रीधर भोगण, धनाजी देसाई,के. आर. पथवे, मोहसीन पटेल, सॅमसन धूपदाळे, तानाजी सावंत, एल. आर. पूजारी, रवि पाटील आदी उपस्थित होते. कपिल बिर्जे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment