तुर्केवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन, कधी आहे हा मेळावा? - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2020

तुर्केवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन, कधी आहे हा मेळावा?

चंदगड / प्रतिनिधी

     चंदगड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व काजू कारखानदार यांना  
शेतीविषयक मार्गदर्शन तसेच *काजू विकास बोर्ड* काजू प्रक्रिया या विषयावर व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे 19 डिसेंबर रोजी तीन वाजता मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, तुर्केवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
        यामध्ये खासदार विनय प्रभाकर सहस्रबुद्धे (राज्यसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य), डॉ. परशूराम पाटील (भारत सरकार शेतमाल निर्यात विभाग व सल्लागार- एशियन डेव्हलपमेंट बँक), तसेच प्रदीप गाणू (चेअरमन गाणू फार्मस हैदराबाद) हे मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील सर्व शेतकरी व काजू कारखानदार यांनी उपस्थित राहावे असे अहवान मोहन परब व महादेव वांद्रे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment