मालवाहू वाहनाला अपघात, हलकर्णीचे निलेश जाधव जखमी? वाचा कोठे झाला अपघात? - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2020

मालवाहू वाहनाला अपघात, हलकर्णीचे निलेश जाधव जखमी? वाचा कोठे झाला अपघात?

 

              अपघातग्रस्त्त्त वाहन

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

होसुर- कौलगे- ढोलगरवाडी मार्गे हलकर्णी ला जात असताना निलेश नारायण जाधव (वय 25, रा. हलकर्णी, ता. चंदगड) यांचे जीतो महिंद्रा हे चारचाकी माल वाहू वाहन झाडाला धडकल्याने जखमी झाले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली.

 त्यांच्यावर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. निलेश यांची हलकर्णी एमआयडीसी येथे आदर्श ही बेकरी पदार्थ निर्मितीची फॅक्टरी आहे. बेकरीतून माल घेऊन ते होसुर हून कौलगे ढोलगरवाडीमार्गे हलकर्णीला जात असताना अचानकपणे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी विरुद्ध दिशेला जाऊन एका झाडाला धडकली. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला काचा फुटून लागल्या तर त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर बेळगाव येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.


No comments:

Post a Comment