कार्वे येथील एन.टी. एस. परीक्षा केंद्रावर सर्व परिक्षार्थीची थर्मल चाचणी करताना कर्मचारी.
तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा
इयत्ता १० वी इयत्तेसाठी असणारी नॅशनल टॅलेन्ट सर्च परीक्षा चंदगड तालूक्यातील कार्वे केंद्रावर शांततेत पार पडली. केंद्र संचालक म्हणून एस.वाय. कुंभार यानी काम पाहिले.
या केंद्रावर १४६ विद्यार्था प्रविष्ठ होते. कोवीड नियमांचे पालन करत ही परिक्षा घेण्यात आली. सकाळी १०.३० ते १२.३० व दुपारी १.३० ते ३.३० असे दोन पेपर घेण्यात आले. यासाठी आठ ब्लॉक करण्यात आले होते. गटशिक्षणाधीकारी सौ. सुभेदार यांनी केंद्राला भेट देऊन पहाणी केली. विद्यार्थी वर्गाचा कोणताच अभ्यासक्रम न होता सुद्धा तणावमुक्त वातावरणात परीक्षा विद्यार्थ्योनी परिक्षा दिली.
No comments:
Post a Comment