पाटील, बी. जी. मांगले, शिवाजी पाटील, सुबराव पवार व अन्य मान्यवर.
कागणी : एस. एल. तारिहाळकर
होसुर (ता. चंदगड) येथील सुबराव पवार (लेखापाल, आरोग्य विभाग, जि. प. कोल्हापूर) व पुंडलिक पवार (सहाय्यक शिक्षक, महाराष्ट्र हायस्कूल, ता. गडहिंग्लज) या बंधूनी आपली आई शांताबाई रामचंद्र पवार यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबीर भरवून आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
शुक्रवारी दि. ११ रोजी सदर शिबिराचे उद्घाटन आ. राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, ``आपल्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून पवार कुटुंबीयांनी केलेले समाजासाठी कार्य मोठे आहे. त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक उपक्रम राबवावेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पुष्पमाला जाधव होत्या. रक्तदान शिबिर हे महादान आहे. राज्यात रक्ताची कमतरता जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांनी रक्तदान शिबिरासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन केले होते. याची दखल घेत पवार कुटुंबीयांनी रक्तदान शिबिर भरवले. हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे आ. पाटील म्हणाले. यावेळी कोल्हापूर येथील जागर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले यांनी सामाजिक जाणीव चांगली राहिली तरच चांगल्या समाजाची उभारणी होते. पवार कुटुंबियांनी याच जाणिवेतून विविध उपक्रम राबवले आहेत. पुष्पमाला जाधव यांचे भाषण झाले. कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघ संचालक विनोद पाटील, नेसरी येथील उद्योजक किरण गंगली, संदीप शहापूरकर यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सुबराव पवार, पुंडलिक पवार, कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले उपस्थित होते. यावेळी भाजपचे तालुका कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील (नागरदळे), प्राचार्य डॉ. ए. एस. जांभळे, सतीश निर्मळकर, सुशांत मोरे, यल्लाप्पा पाटील, गणेश ढेकोळकर, दिग्विजय सावंत, रविराज पवार, शोभा बसरिकट्टी, मधुरा शिंदे, सुकन्या पाटील, शितल ढेकोळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बेळगाव येथील महावीर ब्लड बँकेच्या तज्ञांनी रक्त संकलन केले. या शिबिरात 40 हून अधिक जणांनी रक्तदान केले.
No comments:
Post a Comment