लाकूरवाडीच्या सरपंचपदी सुजाता राजगोळकर बिनविरोध - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2020

लाकूरवाडीच्या सरपंचपदी सुजाता राजगोळकर बिनविरोध

                                                                    सुजाता राजगोळकर

चंदगड / प्रतिनिधी

       लाकूरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ सुजाता नंदकुमार राजगोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली . सरपंच प्रकाश निटूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर राजगोळकर यांची निवड झाली .निवड समितच्या अध्यक्षस्थानी मडंल अधिकारी आप्पासाहेब जिरनाळे होते . यावेळी उपसरपंच सुरेश पवार , आप्पाजी राजगोळकर , लक्ष्मण जाधव , माधुरी कोळसेकर , आनंदी रेडेकर , अनिता निट्टरकर, माजी सरपंच भिमराव राजगोळकर, नामदेव निट्टूरकर,,बाळू दळवी, गंगाजी कोळसेकर,वैजु गावडे उपस्थित होते.सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास करणार असल्याचे नूतन सरपंच सौ राजगोळकर यानी सांगितले.No comments:

Post a Comment