चंदगड येथे पोलीस पाटील कोरोना योध्द्यांचा सत्कार, अवैध धंद्याबाबत कडक पावले उचलणार - डीवायएसपी गणेश इंगळे - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2020

चंदगड येथे पोलीस पाटील कोरोना योध्द्यांचा सत्कार, अवैध धंद्याबाबत कडक पावले उचलणार - डीवायएसपी गणेश इंगळे

चंदगड येथे कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या तूर्केवाडी येथील पोलिस पाटील माधूरी कांबळे यांना प्रशस्तीपत्र देताना डिवायएसपी गणेश इंगळे, पो. नि. तळेकर आदी.

चंदगड / प्रतिनिधी 

                चंदगड तालुक्यात कोणत्याही अवैद्य धद्यांना थारा दिला जाणार नाही. तालुक्यात जर काही बेकायदेशीर कृत्य घडत असल्यास पोलीस पाटील यांनी विश्वासाने पोलिस खात्याला माहिती पुरवावी, त्यावर त्वरित कारवाई केली जाईल. कोणत्याही अवैद्य धंद्यांना पाठिशी घातले जाणार नाही,तसेच खोटी माहिती किंवा खोट्या तक्रारी दिल्यास त्यावरही कारवाई केली जाईल असे प्रतिपादन गडहिग्लज उपविभागाचे पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले. चंदगड येथे कोरोना काळात पोलीस पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

   स्वागत पोलिस निरीक्षक बी ए तळेकर यांनी केले. श्री इंगळे पूढे म्हणाले पोलीस पाटील हे जनता आणि पोलीस प्रशासनातील दुवा असून त्यावरच कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होते, त्यामुळे 

 पोलीस पाटील यांनी देखील सातर्कतेने काम करावे, त्यांनी जर कामात कुचराई केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यास कमी पडणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

कोरोना काळात पोलिस पाटील यांनी  केलेल्या कामाचे इंगळे यानी यावेळी  कौतुक केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार , हवालदार  रावसाहेब कसेकर, आर.पी. किल्लेदार, वैभव गवळी, सूर्यकांत सुतार,अमृत देसाई, प्रकाश पाटील,राजेंद्र पाटील, रेखा गावडे, वैष्णवी कलखांबकर, कोमल सावंत आदी उपस्थित होते.1 comment:

Unknown said...

सर्व पोलीसपाटील यांनी केलेल्या कार्याचे काही प्रमाणात कौतुक झाले.
पोलीस खात्याचे अभिनंदन.

Post a Comment