केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात शेकापचे तहसिलदाराना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2020

केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात शेकापचे तहसिलदाराना निवेदन

चंदगड / प्रतिनिधी

           केंद्र शासनाने किसान विरोधी व कामगार विरोधी कायदे रद्द करण्याबाबत केंद्र सरकारने कायदे काढले आहेत ते शेतकरी कामगार विरोधी कायदे आहेत. सर्व कायदे  रद्द करावेत या मागणीसाठी दिल्ली व संपूर्ण देशात किसान आंदोलन चालू आहे. सदर आंदोलनास भारतीय शेतकरी कामगार पक्ष, चंदगड तालुका पाठिंबा देत असून केंद्र सरकारने किसान विरोधी कायदे रद्द करुन शेती खाजगी कंपनीच्या ताब्यात जाण्यापासून थांबवावी,  स्वामीनाथन आयोग लागू करुन उत्पादन खर्च धरुन ५० % नफ्यासह शेती हमीभाव जाहीर करावा,  केंद्र सरकारने कंपन्यामध्ये व सरकारमधील खाजगीकरण कंत्राटी पध्दतीने कामगारांची नेमणूक करणे बंद करावे व कंत्राटी पध्दत बंद करावी,  दिल्लीमध्ये चालू असलेल्या किसान आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडत असलेल्या शेतकरी बंधूच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने तात्काळ अर्थसहाय्य करावे,  त्यांची कर्जे माफ करावीत अश्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले  असून , सदर मागण्या तात्काळ मान्य कराव्यात,  मान्य न झाल्यास भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. चंद्रकांत बागडी, नारायण वाईगडे, अॅड रवि  रेडेकर, तुकाराम पाटील, महादेव कांबळे, भिमराव चिंमणे, पांडूरंग कांबळे, वामण कूडतरकर यावेळी उपस्थित होते. 



No comments:

Post a Comment