नागरदळेच्या शिवाजी पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे डोंबिवली येथे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2020

नागरदळेच्या शिवाजी पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे डोंबिवली येथे प्रकाशन

काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर.



कागणी : एस. एल. तारीहाळकर

      मुळचे नागरदळे (ता. चंदगड) व सध्या राहणार कोपरगाव, डोंबिवली(प), मुंबई येथील कवी शिवाजी वि. पाटील यांच्या  'माझी ती' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा थाटात पार पडला. लेखक व प्राचार्य आदित्य अंकुश देसाई, कवी व पत्रकार सन्ना मोरे, महाराष्ट्र केसरी पुरस्कार विजेते पै. विष्णु जोशिलकर, किणीचे सुपुत्र व मुंबई येथील नाट्यलेखक, दिग्दर्शक जीवन कुंभार, ताम्रपर्णी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा बामणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

              पै. विष्णु जोशिलकर यांच्या पुतणी व शिवाजी पाटील यांच्या पत्नी जयश्री यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांचे पती शिवाजी व्ही. पाटील लिखित माझी ती या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आदित्य देसाई (ग्रामीण शिक्षण संस्था, ठाणे) होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कीर्तनकार व कवी शामसुंदर महाराज सोन्नर, प्रसिद्ध चित्रकार व कवी चित्रकार विजय बोधनकर, महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते, सिनेकलाकार विष्णू जोशीलकर, मुक्तछंद प्रकाशनचे प्रमुख व पत्रकार सन्ना मोरे, नाट्यदिग्दर्शक जीवन कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागरदळे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे चेअरमन ईश्वर पाटील, उद्योजक सत्तुराम  मनगुतकर, ताम्रपर्णी प्रतिष्ठान'चे अध्यक्ष कृष्णा बामणे, निवृत्त सहायक पोलिस निरीक्षक गोविंद कोकितकर, संजय पाटील नेपथ्यकार दिग्दर्शक प्रकाश लाड, अथर्व निर्मित कला शृंगार मुंबईचे अशोक कातकर, अभिनव बँक मॅनेजर पांडुरंग म्हात्रे, कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ डोंबिवलीचे ईश्वर पाटील, कोटक महिंद्रा चे ब्रांच मॅनेजर मोहन पाटील उपस्थित होते.

             सूत्रसंचालन निवेदिका स्वप्ना देशपांडे यांनी केले. कवी शिवाजी पाटील, तुषार पाटील, सत्यजित पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरदळे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी परिश्रम घेतले.





No comments:

Post a Comment