कागणीजवळ अपघात, दुचाकीवरून पडून बेनकनहळीच्या तरुणाचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2020

कागणीजवळ अपघात, दुचाकीवरून पडून बेनकनहळीच्या तरुणाचा मृत्यू

                                              सागर बळवंत पिसाळे

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

         कागणी ते कोवाड (ता. चंदगड) या मार्गावर कागणीजवळ  दुचाकीवरुन जात असताना पडल्याने बेनकनहळी (ता. बेळगाव) येथील सागर बळवंत पिसाळे (वय 35) यांचा मृत्यू झाला. सुनील भीमराव देसाई यांच्या शेताजवळ ही घटना घडली. कोवाड पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. सागर व त्यांचे सहकारी हे किणी येथे शट्टुप्पा गोपाळ बेनकेकर यांच्या घरी फरशी बसविण्याच्या कामाला जात असताना गुरुवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. सागर यांच्या पश्चात आई, पत्नी, चार वर्षांचा मुलगा आहे. अधिक तपास कोवाड पोलीस करत आहेत.No comments:

Post a Comment