ओलम (हेमरस) साखर कारखान्याच्या वाहनांना रिफ्लेक्टर - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2020

ओलम (हेमरस) साखर कारखान्याच्या वाहनांना रिफ्लेक्टर

          हेमरस ओलम ऍग्रो साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या वाहनांना रेफ्लेक्टर बसविताना मान्यवर


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

          हेमरस ओलम ऍग्रो साखर कारखान्याकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आली. ओलम ऍग्रो साखर कारखान्याच्या गळीत हंगाम जोमाने सुरू आहे.ऊस पुरवठा करणारी वाहने ही रात्री अपरात्री वाहतूक करत असल्याने संभाव्य धोका होऊ नये होणारे अपघात टाळण्यासाठी कारखान्याच्या वतीने वाहतूक करणाऱ्या संपूर्ण वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आल्याचे कारखान्याचे सहायक शेती अधिकारी नामदेव पाटील यांनी सांगितले.

       यावेळी कोवाड येथे झालेल्या कार्यक्रमात कारखान्याचे चीफ सिक्युरिटी ऑफिसर प्रकाश रेडकर,दयानंद देवण, किणी येथील श्री अष्टविनायक शेतकरी गटाचे संजय कुट्रे,मारुती मोटूरे,प्रकाश पुजारी,जॉन लोबो,एस एल पाटील,कोवाडचे माजी उपसरपंच विष्णू आडाव यांच्यासहीत कोवाड पोलीस चौकी चे एएसआय हणमंत नाईक,पोलीस कॉन्स्टेबल मानसिंग चव्हाण,अमर सायेकर,सुभाष शिंदे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment