चंदगड /प्रतिनिधी :
चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपसा सूरू आहे. याबाबत तहसिलदार आणि संबंधित अधिकारी यांना याबाबतीत वेळोवेळी तक्रारी देवुनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे याबाबत त्वरित दाखल घेऊन दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी चंदगड तालुका भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन फाटक यांनी निवासी जिल्हाधिकारी गलांडे यांचे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चंदगड तालुक्यात राजगोळी, चन्नेटी, खन्नेटी आणि चिंचणे या भागातून बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. तसेच खामदळे येथे मुरूम आणि दगडाचे अवैध उत्खनन होत आहे. याबद्दल वेळोवेळी संबंधित अधिकारी आणि तहसीलदार यांना व्यक्तिश: भेटून आणि फोनद्वारे कळवूनही अशा लोकांवर कारवाई केली जात नाही, उलट दुर्लक्षच केल्याचे दिसून येते. त्यामुळे यामध्ये सामील असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई अशी मागणी निवेदनाद्वारे मागणी केली आहे . जर यामध्ये जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकार्यांवर कारवाई झाली नाही तर हरित लवादाकडे दाद मागितली जाईल असेही निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment