कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद - सभापती अॅड. कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2020

कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद - सभापती अॅड. कांबळे

 चंदगड येथे मराठी पत्रकार परिषद च्या ८२व्या वर्धापनदिन निमित्ताने पत्रकारांची आरोग्य तपासणी

चंदगड येथे तालुक्यातील पत्रकारांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमावेळी बोलताना सभापती अॅड. अनंत कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. के. खोत, वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. एस. साने, अध्यक्ष नंदकुमार ढेरे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    कोरोनाच्या काळात पत्रकारांनी जबाबदारीने सामाजिक बांधिलकीने सर्व घडामोडी समाजापर्यंत पोहोचवल्या वेळप्रसंगी सर्वांच्या आरोग्याची  पर्वा न करता कोरोना   बाबतीत जागृती केली. आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा व पत्रकार या तीन घटकांच्या माध्यमातून आपण कोरोनाला हद्दपार करत आहोत,चंदगड तालुक्यातील आरोग्य विभागाची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती अँड.अनंत कांबळे यांनी केले. चंदगड येथे मराठी पत्रकार परिषद च्या ८२व्या वर्धापनदिन निमित्ताने परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविक तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अनिल धुपदाळे यांनी करताना देशातील सर्वात जुनी व पत्रकारांची मातृसंस्था अशी ओळख असलेल्या मराठी पत्रकार परिषद च्या  कार्याची  थोडक्यात माहिती

तालूकाआरोग्य अधिकारी डाॅ आर के खोत यानी कोरोना काळात पत्रकारांनी जीवावर उदार होऊन समाजाला माहीती पूरवण्याचे काम केले आहे, कोरोनाची माहीती घेत असतांना त्यांचा आरोग्याकडे दूर्लक्ष झाल्याने अनेक पत्रकार आजारी पडले आहेत,त्यांमूळे हि आरोग्य तपासणी पत्रकारासोबत त्यांच्या कूटूबियांना सुरक्षितता देणारी आहे. ग्रामीण रूग्णालयाचे डाॅ सूहास साने यांनी कोरोना काळात आरोग्य कर्मचार्यासोबत पत्रकारांनीही केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले .यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनीही मनोगत व्यक्त केले.  

  यावेळी  तालुका पत्रकार संघाच्या  सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली.यावेळी संजय चंदगडकर,सी एल न्यूज चे संपादक संपत पाटील,उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सूनिल कोंडूसकर ,नारायण गडकरी,विलास कागणकर, संजय के पाटील, संतोष सावंत,संजय एम पाटील, संतोष सूतार,राजेंद शिवनगेकर आदीसह पत्रकार मित्र उपस्थित होते. सूत्रसंचालन चेतन शेरेगार यांनी केले तर आभार उदयकूमार देशपांडे यांनी मानले.यावेळी पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आली.




No comments:

Post a Comment