राष्ट्रवादी पक्षामार्फत घेण्यात आलेली व्हर्चुअल डिजिटल रैली चंदगडपर्यंत पोचली, हे कालच्या कार्यक्रमाच यश - शरद पवार - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2020

राष्ट्रवादी पक्षामार्फत घेण्यात आलेली व्हर्चुअल डिजिटल रैली चंदगडपर्यंत पोचली, हे कालच्या कार्यक्रमाच यश - शरद पवार

                 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विविध विषयावर चर्चा करताना आमदार राजेश पाटील.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     रविवारी (ता. १२) आमदार राजेश पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने  खासदार व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली व शुभेच्छा दिल्या. यावेळी शरद पवार यानी चंदगड मध्ये जो कार्यक्रम झाला, ती व्हर्चुअल डिजिटल रॅली चंदगड पर्यंत पोहचती हेच कालच्या कार्यक्रमाचे यश असल्याचे सांगितले.

       यावेळी शरद पवार यानी कालचा कार्यक्रम तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पर्यन्त पोचला का ? कार्यक्रम कसा वाटला ? याची चौकशी केली . यावेळी आमदार राजेश पाटील यांनी आम्ही आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल रक्तदान शिबीर आयोजित केले होते तसेच आपली व्हिर्चुअल रैली लाईव्ह दाखवण्यात आली व अनेक  राज्यातील नेत्यांनी  आपली राजकीय, सामाजिक व राज्यासाठी,देशासाठी दिलेल्या योगदानाचा कार्यकर्त्यांच्या समोर उलगडा झाला  व त्यांच्या ज्ञानात भर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आपल्या बद्दलचे प्रेम दृढ झाले व त्यांच्या मध्ये नवचैतन्य व उत्साह निर्माण झाल्याचे व्यक्त केले. यावर मा. पवार यानी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या चंदगड तालुक्यापर्यन्त हा कार्यक्रम पोचला म्हणजे हे आपले प्रदेशअध्यक्ष मा.जयंतराव पाटील आणि त्यांची सगळी टीम व तुमच्या सगळ्यांचे हे यश आहे असे उद्गागार काढले . यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांवर व  अडीअडचणी बाबतीत शरद पवार यांच्याशी विस्तृत चर्चा झाली. त्या बाबत शरद  पवार यानी आपण त्यामध्ये लक्ष घालतो असे आश्वाशीत केले.


No comments:

Post a Comment