पार्ले येथील पाणंद रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईची मागणी - ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2020

पार्ले येथील पाणंद रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईची मागणी - ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

                                                 मागण्यांचे निवेदन देताना पार्ले ग्रामस्थ.

चंदगड / प्रतिनिधी

        मौजे पार्ले (ता .चंदगड) येथे पुर्वापार चालत आलेल्या वहिवाटी खालील पांणद रस्ते आडवणूक करणार्या शेतकऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसिलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले आहे. याबाबतच्या प्रती आमदार, प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत. 

      निवेदनात म्हटले आहे की, ``गट नं ५१/१ मधील  जमिनितून शिवारातील, वाडी, वस्तीवर जाण्या-येण्यासाठी पाणंद रस्त्याची नोंद आहे. पण या पाणंद रस्त्यावर  अतिक्रमण करून हे पाणंद आडवण्यात आले आहेत. तसेच याच जमिनीतून पार्ले गावाला पाणी पूरवठा करणारी नळपाणी योजना कार्यान्वित आहे. या नळपाणी योजनेचीही या शेतकऱ्यांनी दोन तीन वेळा मोडतोड केलेली आहे. नळपाणी योजना व पाणंद रस्ते दुरूस्त करून मिळावेत अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे पंचायत समिती कडे केली. त्यानुसार नळपाणी व रस्तेही दुरूस्ती केलेले आहेत. पण परंतु गट नं. ५१/१ च्या जमिन मालकांनी जाण्या येण्याचा गावकऱ्यांचा हक्क सबंध डावलून व निव्वळ त्रास देण्याच्या हेतूने चंदगड न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे गट. नं ५१/१ मधील झालेल्या ग्रा. पं. नोंदीच्या रस्त्याबरोबर सदर क्षेत्रातून जाणारे व अन्य पाणंद रस्ते व गावाला जोडणारे रस्ते दुरुस्त करुन मिळावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर तंटामूक्त अध्यक्ष गोविंद मालू गावडे, महादेव मयेकर, दत्ता फाटक, मारूती कांबळे, लक्ष्मण गावडे, जिवणू गावडे, संभाजी गावडे, विठोबा मयेकर, तुकाराम गावडे, विठ्ठल गावडे, रामू देवळी, अजय कांबळे, अशोक सूतार, विठ्ठल जानकर, शंकर मयेकर आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहेत.



No comments:

Post a Comment