तेऊरवाडी येथील दयानंद पाटील याना COT चा बहुमान, काय आहे COT वाचा सविस्तर? - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2020

तेऊरवाडी येथील दयानंद पाटील याना COT चा बहुमान, काय आहे COT वाचा सविस्तर?

                                                                   दयानंद पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विमा सल्लागार दयानंद वसंत पाटील यानी LIC गडहिंग्लज शाखेच्या इतिहासामध्ये प्रथमच COT (एका वर्षात तीन वेळा MDRT) चा बहुमान मिळूवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
      गेली ११ वर्षे ते सतत MDRT (USA) चा पुरस्कार मिळवत आहेत. कोल्हापूर विभागामध्ये ग्रामिण भागातून असा पुरस्कार मिळवणारे दयानंद पाटील पहिलेच विमा सल्लागार आहेत. यामुळेच त्यांना अमेरिकेतील न्यू ऑर्रेन्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित राहण्याची संधी मिळाली. याबरोबरच ग्रामीण भागामध्ये आयुर्विमा रुजविण्यामध्ये त्यानी मोलाची भूमिका बजावली आहे. उत्कृष्ठ सेवा व  योग्य सल्ला  देण्यामध्ये श्री पाटील यांचा हातखंडा आहे. याकामी त्यांना LIC चे वरिष्ठ शाखाधिकारी दिलीप मोरे, किरण अवचिते, गोपाळ जोशी, चंद्रशेखर सोनवणे, विकास अधिकारी अरूण उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment