रविकिरण पेपर मिलमधील कामगारांच्या संपाबाबत बैठक घ्या, शिवसेनेची कामगार आयुक्तांकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2020

रविकिरण पेपर मिलमधील कामगारांच्या संपाबाबत बैठक घ्या, शिवसेनेची कामगार आयुक्तांकडे मागणी

   कामगारांच्या संपाबाबत बैठक घेण्याचे निवेदन कामगार आय़ुक्तांना देताना शिवेसना जिल्हाप्रमुख विजय देवणे.

चंदगड / प्रतिनिधी

             हलकर्णी (ता. चंदगड) येथील औधोगिक वसाहती मधील रविकिरण पेपर मिल्समध्ये कंपनीच्या मालकानी कामगारांना योग्य मोबदला न देता राबवून घेत होते. तसेच आठवड्याची सुट्टीही दिली जात नव्हती, याबाबत कामगारांनी वेळोवेळी मागणी करुन देखील कंपनी मालकांनी कामगारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. याउलट कंपनीच्या संचालकानी ६ स्थानिक कामगारांना निलंबित केले आहे, उर्वरित ४८ कामगारांची नोंद दोन ठेकेदाराकडे कागदोपत्री दाखवली आहे. 

       सध्या काम नसल्याचे कारण दाखवून त्यांनाही कामावरून कमी करण्यात आले आहे. तसेच सध्या ५० हून अधिक उत्तर भारतीय कामगार कंपनीत काम करत असून त्या कामगारांना काम आहे पण स्थानिक कामगारांना काम नाही . त्यामुळे स्थानिक कामगारावर अन्याय झाल्याने शांततेच्या मार्गाने कामगारांनी संप पुकारला आहे.त्यामुळे स्थानिक ८०% भूमिपूत्रांना कामावर घ्यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने  कोल्हापूर विभागाचे कामगार आयुक्त संदेश आयरे याांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.याशिवाय रविकिरण पेपर मिल्स् च्या कामगार व  प्रांताधिकारी, तहसिलदार ,मालक व्यवस्थापक  यांची  तातडीची बैठक घेणेत यावी, निलंबित ०६ कामगारांना त्वरित कामावर घेणेत यावे ,रविकिरण पेपर मिल्स् हलकर्णी येथे महाराष्ट्र शासनाच्या कामगार कायद्याप्रमाणे ८० % चंदगडला भुमीपुत्राला नोकरीत घेणेत यावे, रविकिरण पेपर मिल्स्  मध्ये केंद्र व राज्य शासनाचे कामगार कायद्याच्या अंमलबजावणीची सक्ती करणेत यावी. अशी मागणी शिवसेनेेचे जिल्हाप्रमूख विजय देवणे यांनी निवेदनाद्वारे कामगार आयुक्त संदेश आयरे यांचे कडे केली आहे.



No comments:

Post a Comment