ऑनलाईन मिडिया
WhatsApp या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सर्वांधिक लोक सद्या ॲक्टीव्ह आहेत. WhatsApp चा वापर आपण आतापर्यंत केवळ मेसेज, चित्र व व्हीडीओ यांची आदानप्रदान करण्यासाठी वापरत होते. मात्र WhatsApp ने आणलेल्या नवीन फिचरनुसार WhatsApp वर आता पैशांचे व्यवहार करता येणार आहेत. आजपासून भारतातून WhatsApp Pay हि पेमेंट सर्व्हीस सुरु झाली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ही मान्यता दिली आहे.
WhatsApp Pay कसे वापरायचे
व्हाट्सअपच्या स्क्रीन वर उजव्या बाजूला तीन डॉट दिले आहेत, त्यांना टच करा.
यामध्ये अनेक विकल्प असून त्यातील 5 नंबरच्या पेमेंट या पर्यायावर क्लिक करा.
ॲड पेमेंट मेथड वर क्लिक करा.
यानंतर आपल्याला बँकांची लिस्ट येईल, यामधून आमचे खाते असलेली बँक निवडा.
तुमचे खाते व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या बँक खात्याला रजिस्टर असलेल्या मोबाईलवर एक एसएमएस प्राप्त होईल.
ओटीपी टाकून व्हेरिफाय केल्यानंतर आपले व्हेरिफिकेशन पूर्ण होईल.
यासाठी आपला जो मोबाईल नंबर व्हाट्सअपशी कनेक्ट नंबर आहे. तोच नंबर बँकेच्या खात्याला जोडलेला असणे आवश्यक आहे.
व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर यूपीआय पिन जनरेट करा, यामध्ये आपण आपल्या आवडीचा नंबर दोन वेळा टाका. आपले अकाऊंट व्हेरीफाय होईल.
* पेमेंट अकाउंट तयार झाल्यानंतर ते कसे वापरायचे *
ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे व्हाट्सअप चॅट ओपन करा.
मेसेज बॉक्स वरील अटॅचमेंट या पर्यायावर टच करा.
त्यानंतर पेमेंट वर टॅप करा, आपल्याला किती पैसे पाठवायचे आहेत ते रक्कम टाका.
त्यानंतर आपण सेट केलेला यु. पी. आय. पिन नंबर टाका.
यानंतर काही वेळात आपल्याला पेमेंट कन्फर्मेशन मेसेज येईल.
अशा पद्धतीने आपली पेमेंट प्रोसेस पूर्ण होईल.
सौजन्य - FE Online
No comments:
Post a Comment